गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (14:18 IST)

Mother commits suicide चिमुकल्यांना मारून आईची आत्महत्या

महाराष्ट्रातील सोलापूर येथे नवरा बायकोच्या वादामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. वीजापूर नाका क्षेत्रात आईने दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली आहे. 
 
महिलेचे नाव सुहास चव्हाण असून तिनी आत्महत्या करून घेतली. त्या अगोदर तिनी आपल्या दोन्ही मुलांचे अथर्व आणि आर्य यांची हत्या केली. सूचना मिळताच बीजापूर नाका पोलिस घटनास्थळी पोहोचली. 
 
आईने घेतला मुलांचा जीव 
आईने उशी मुलांचा तोंडावर ठेऊन त्यांना मारले. त्यानंतर तिने स्वत: फाशी लावून घेतली. ज्योती आपल्या नवरा आणि मुलांसोबत बीजापूर रोड स्थित राजस्व नगर येथे राहत होती. सध्या ह्या घटनेमुळे सर्वत्र शोक पसरला आहे.

ज्योतीचे पती सुहास चव्हाण हे एसटीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती समोर आली असून त्याच वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अथर्व आणि आर्या हे शाळेला सुट्टी असल्याने घरी होते. गुरुवारी दुपारी टीव्ही पाहत असताना ज्योतीने टीव्हीचा आवाज वाढवला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून दाबली. यात दोन्ही मुलांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतीने स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवलं.