बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 11 मे 2022 (10:31 IST)

आईसह दोन मुलांची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात एका धक्कादायक घटनेत आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 
सोनाली सिद्राम चोपडे, मोठा मुलगा संतोष सिद्राम चोपडे (वय वर्षे 8), लहान मुलगा संदीप चोपडे (वय वर्षे 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) यांनी आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाले आहे.