शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (08:22 IST)

संभाजीराजेंबद्दल शिवसेना-काँग्रेसला विचारावे लागेल- शरद पवार

sharad pawar
कोल्हापूर- राज्यसभेची टर्म संपल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माजी वाटचाल पुरोगामीची असेल असं जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये येण्याची जाहीर ऑफर दिली होती. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल महत्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्राचे जे काही प्रश्न असायचे त्यावेळी संभाजीराजे आणि आमची भेट व्हायची. त्यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभले आहे. मात्र त्यांना राष्ट्रवादीत घेण्याबाबत काही चर्चा झालेली नाही. त्यांना घ्यायचे झाले तर आम्हाला अगोदर शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा करावी लागेल. असे विधान शरद पवार यांनी केले.
 
राज्य द्रोह कायद्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती केंद्राने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी, भीमा कोरेगाव दंगलीनंतर मला नोटीस काढली,त्यावेळी माझा सल्ला मागितला होता. पण सरकार विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार मला आहे. भीमा कोरेगाव सारखा प्रकार पुन्हा घडू नये. यात बदल करण्यासाठी पहिल्यांदा केंद्राने विरोध केला होता,आता मात्र केंद्र सरकार सकारात्मक आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून बोलताना पवार यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक १५ दिवसांत जाहीर करा हा गैरसमज आहे.निवडणूक प्रक्रियेला दोन महिने लागतील, जिथून थांबवलं तिथून पुन्हा प्रक्रिया सुरु होणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर बोलण्यासारखं खूप आहे. पण तुम्हालाही आणि मलाही नोटीस येईल. असे पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित महाविकास आघाडी एकत्र येईल का? यावर बोलताना,महाविकास आघाडी एकत्र येईल याबाबत चर्चा झाली नाही, पण राष्ट्रवादीची चर्चा झाली आहे. अनेकजण आपण वेगवेगळ्या चिन्ह्यावर निवडणूक लढवूया. निकालांनंतर एकत्र येऊया असं मत आहे. तर अनेकजण आपण एकत्र निवडणूक लढवूया असं सांगत आहेत. असं पवार यांनी स्पष्ट केलं.