1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (21:57 IST)

गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटींचा दंड

Gavit sentenced to one year imprisonment and fined Rs 2 croreगावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटींचा दंड Marathi Regional News  In Webdunia Marathi
न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एका चेक बाऊन्सच्या केसमध्ये खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटींचा दंड ठोठावला आहे. एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंडाची शिक्षा खासदार राजेंद्र गावित यांना सुनावण्यात आला आहे. एका भूखंड व्यवहारात राजेंद्र गावित यांनी चेक दिले होते. परंतु चेक बाऊन्स झाल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गावित यांच्याविरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता यावर न्यायालयाने सुनावणी करताना गावितांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
शिक्षा देण्यापूर्वी शिक्षेविषयी दोन्ही फिर्यादींचे काय म्हणणे आहे असे विचारण्यात आले होते. यावर आरोपी खासदारांनी रक्कम २०१४ मध्ये घेतली होती. जमीन विकसित करण्याचा करार करुन दिला होता. कराराची पुर्तता केली नाही म्हणून २०१७ मध्ये दिवाणी कोर्टात दावा करण्यात आला होता.
 
जमिनीचा एक व्यवहार होता यामध्ये १८ मार्चरोजी चेक बाऊन्सप्रकरणी बाफना कोर्टात गेले होते. गावित यांना १ महिन्याची मुदत जामीन अर्जासाठी दिला आहे. परंतु जमीनीचा व्यवहार गेल्या अनके वर्षांपासून सुरु होता. पैसे देतो असे गावित सांगत होते यानंतर बाफना यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे