शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (17:04 IST)

शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने या उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योत वाहून आणली जाते. या निमित्ताने शिव ज्योत दौड चे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता आयोजित शिव ज्योत दौड मध्ये 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येणार. या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून मान्यता मिळाली आहे. 
 
छत्रपती शिवाजी जन्मोत्सव आणि शिव ज्योत दौड आरोग्याच्या नियमांचं पालन करून आणि स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घेऊन शिवजन्मोत्सव साजरे करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडून शिवभक्तांना आवाहन करण्यात आले आहे.  
 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिव ज्योत दौड आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा करण्यासाठी अनुमती देण्याचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडे दिला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केला असून या शिवज्योती  दौड मध्ये 200 जण तर शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांची मंजुरी देण्यात आली आहे. या बाबतचे निर्देश गृह विभाग सह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहे.