शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (15:17 IST)

‘गुगल’ची मदत घेतली मात्र भयानक सत्य आले बाहेर

नाशिकमध्ये  वडिलांसोबत फिरायला गेलेली ९ वर्षीय मुलगी शनिवारी रात्री बेपत्ता झाली होती. सुमारे चार तास शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी आपल्या श्वान पथकातील ‘गुगल’ची मदत घेतली. गुगलेनेही पोलिसांना निराश न करता अवघ्या अर्धा तासात बेपत्ता मुलीचा शोध घेतला. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड परिसरातील ९ वर्षीय मुलगी रात्री दहा नंतर तिच्या वडिलांसोबत फिरायला गेली होती. काम असल्याने वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले.
काही वेळाने वडील घरी गेले त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही तिचा शोध सुरू झाला. ९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना समजली, घटनेची माहिती समजताच उपनगर पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. मुलीचा शोध तिच्या घराजवळील परिसरातच सुरू होता. नातलग आणि पोलिसांनी परिसरातील बहुतांशी घरं, मैदान, इमारतींचे टेरेस सर्व ठिकाणी मुलीचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. रात्री १२.३० च्या सुमारास पोलिसांनी गुगलची मदत घेण्याचा निर्णय घेतला, पोलिसांनी गुगलला घटनास्थळी बोलवले. गुगलला बेपत्ता मुलीच्या कपडे व चपलांचा वास दिला.
 
मुलगी ज्या मार्गाने गेली तसाच मार्ग गुगलने दाखवला. परिसरातीलच अंधारातून मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांना आणि पालकांना पाहून मुलीच्या चेहऱ्यावरील भीती दूर झाली. पोलिसांनी मुलीची प्राथमिक चौकशी करून तिला पालकांच्या ताब्यात सोपवले पहिल्यांदा प्रथमदर्शनी मुलगी ही कदाचित रस्ता विसरुन अंधारात हरवली असावी असा कयास कुटुंबीयांसह पोलिसांनी लावला. मात्र आज या प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झाले आहे हरवलेल्या मुलीस त्रास होऊ लागल्याचे तिच्या आईवडिलांना तिने सांगितले असता त्यांनी आपल्या मुलीस विश्वासात घेऊन प्रेमाने विचारपूस केली असता तिच्यासोबत एका इसमाने अनुचित प्रकार केल्याचे तिने सांगितले.
 
यावरून सदर मुलीच्या आई वडिलांनी ही बाब उपनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना कळवली या प्रकाराची गंभीर दखल घेत उपनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिच्यासोबत एका इसमाने अत्याचार केल्याचे तिने सांगितले यावरून उपनगर पोलिसांनी एका २५ वर्षीय संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून उपनगर पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  आहेत.