मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (17:46 IST)

पुण्यात विरोधकांना बसली सणसणीत 'चापट'

girish bapat from pune
पुण्यात गिरीश बापट विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयाबाहेर पोस्टर लावत बापट यांचे अभिनंदन केले आहे. पुण्यानगरीचे खासदार गिरीश बापट असे लिहीलेला फ्लेक्स भाजप कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे. भाजपाचे कार्यकर्ते राघवेंद्र मानकर यांनी हा फ्लेक्स लावला आहे. 
 
भाजप युतीकडून गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक दिवस काँग्रेसला आपला उमेदवार सापडत नव्हता. एकीकडे बापट यांचा प्रसार सुरु केला होता. त्यानंतर अखेर काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून मोहन जोशी यांना उमेदवारी दिली.