गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (15:04 IST)

लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार, गिरीश महाजन यांची घोषणा

girish mahajan
वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गिरीश महाजन यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केली.
 
"आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. पण सध्या २८ टक्के जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो", असं गिरीश महाजन म्हणाले. तसंच राज्य आत्तापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होतं, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलून आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
 
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल, असंही महाजन म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor