गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (20:31 IST)

कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन

girish mahajan
नाशिकमध्ये 2026-27 मध्ये कुंभमेळा भरणार आहे. या कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्ष पदावर समाधान मानावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.
 
या मेळाव्याच्या कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असली तरी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत स्थान दिले जाणार आहे. सध्या नाशिक पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच गिरीश महाजन यांना कुंभमेळाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे.
 
कुंभमेळासाठी सरकारने चार समित्या गठीत केल्या  आहे. शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपाध्यक्ष पद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह 8 मंत्र्यांचा शिखर समितीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच उच्चधिकारी समितीचे अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे.
 
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळा आरखडा तयार करण्यात आला असून कामाचे नियोजन, वेळेत काम पूर्ण करणे आणि खर्चला मंजुरी आदी कामासाठी सरकारने चार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. गेल्या वेळ नाशिकच्या कुंभमेळा काळात देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळा मंत्री म्हणून तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची निवड केली होती. त्यावेळी महाजन हे पालकमंत्री असतानाही त्यांच्याकडे जिल्हा समितीची जबाबदारी देण्यात देखील ग्रामविकास मंत्रीकडे अध्यक्ष पद आहे. 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor