सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:03 IST)

गिरीश महाजन यांचे खडसे यांच्या टीकेला प्रत्यु्त्तर

girish mahajan
पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावरून भाजपावर टीका केली आहे. जे जे लोक गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ आणि त्यातही ओबीसी नेते आहेत ते ते बाजूला पडले आहेत. यात माझा व पंकजा मुंडे यांचा समावेश आहे, अशी टीका खडसे यांनी केली आहे.
 
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या या टीकेला प्रत्यु्त्तर दिले आहे. मी आणि गुलाबराव पाटील ओबीसी आहोत. आमच्या दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. त्यामुळे सरकारने ओबीसींवर अन्याय केला, हा एकनाथ खडसेंचा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी समाज आहे, असे समजण्याचे कारण नाही. ‘तू-तू, मैं-मैं’ करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा. तुम्ही फक्त शांत राहा, असे त्यांनी सुनावले आहे.