शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कृष्णा नदीत दोघां प्रेमींनी उडी मारली

सांगलीमध्ये एका प्रेमी युगुलाने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
हा प्रकार आज उघडकीस आला असून प्रेमी युगुलाने स्वामी समर्थ घाटावर आत्महत्या केली. यामध्ये मुलगी वाचली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाने स्वामी समर्थ घाटावर नदीत उडी मारून आत्महत्या केली. मात्र, या घटनेत मुलगी बचावली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. तर मुलाग वाहून गेल्याने महापालिका अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. शोध घेणाऱ्या पथकाल मुलाचा मृतदेह सहा तासांनी मिळाला आहे.मुलगा आणि मुलगी हे दोघे आज सकाळी साडेसातच्या सुमारास कृष्णा नदीच्या काठावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याने दोघांनी नदीमध्ये उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीला वाचवले तर मुलगा पाण्यात वाहून गेला. 
 
यामध्ये मुलगी बचावली तर मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलगा हा संजयनगरचा राहणारा असून मुलगी पारगावची असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.