मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:18 IST)

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आली चिमुकली , बोलली ......

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर एका चिमुकलीने बोललेल्या दोन शब्दांनी संपूर्ण सभागृहात उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वजण उभे राहीले मात्र, त्याच दरम्यान गर्दीतून एका चिमुकलीचा आवाज येण्यास सुरुवात झाली. मग, ही चिमुकली रस्ता काढत गर्दीतून पूढे आली आणि स्टेजवर दाखल झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्या चिमुकलीला कडेवर घेतलं त्यानंतर या चिमुकलीने माईकवरुन दोन शब्द बोलले. ते शब्द होते... "राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है". या चिमुकलीचं नाव सिद्धी ज्ञानेश्वर शिंदे आहे. सिद्धी शिंदे ही मुंबई सेंट्रल येथील मनसे पदाधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलगी असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.