शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (18:10 IST)

कोल्हापुर जिल्ह्यातील आजऱ्यात मुलीची छेड; तीन दिवस बंदची हाक

कोल्हापुर जिल्ह्यातील आजऱ्यात शाळकरी मुलीची छेड काढण्याची घटना मंगळवारी घडली. छेड काढणारा मुलगा मुस्लिम असल्याचं मुलीनं सांगितल आहे. त्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत.हिंदु जन आक्रोश मोर्चाकडून या तरुणाचा शोध घेण्यात आला .मात्र तो सापडला नाही.त्यामुळे छेड काढल्याच्या निषेधार्थ तीन दिवस आजरा बंदची हाक देण्यात आली आहे. संबंधित तरुणाचा शोध घेवून योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
दरम्यान, आज जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. छेड काढणारा तरूण मुस्लिम असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे. संबंधित तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीसांची आठ पथके विविध मार्गावर पाठवण्यात आली आहेत. संबंधित तरुणावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. आजरा ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहार सुरु ठेवावेत असे आवाहन ही पोलीस अधिक्षकांनी केले आहे.
 
काय आहे प्रकरण
आजरा येथे मंगळवारी सकाळी एका शाळकरी मुलींची छेड काढण्याची घटना घडली होती.संबंधित मुलीने त्याची माहिती पालकांना दिली. पालकांनी याबाबतची माहिती पोलीसांनी कळवली. मुलीच्या तक्रारीवरून छेड काढणारा तरुण हा मुस्लिम असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्य़ाला अधिकृत दुजोरा अद्याप दिलेला नाही. मात्र ही घटना आजऱ्यात पसरल्यानंतर हिंदु जन आक्रोश मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक होत तीन दिवस आजरा बंदची हाक दिली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor