गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (15:56 IST)

हिंगोलीत मुलीचा विनयभंग, हिंदू संघटनांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ

हिंगोलीच्या बसमत येथे एका महिलेचा रस्त्यात विनयभंग केला.पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.या घटनेची माहिती स्थानिकांना मिळतातच त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला.या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करत रात्री उशिरा पर्यंत आंदोलन केले. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना शांत केले. 

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित महिला रविवारी संध्याकाळी भाजी घ्यायला गेली असता या वेळी इतर समाजाच्या दोन तरुणांनी तिचा विनयभंग केला. नंतर तरुणीने घरी आल्यावर घडलेले सांगितले. कुटुंबीयांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठले. पीडितेची तक्रार नोंदवण्याऐवजी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन पाठवून दिले.ही माहिती स्थानिकांना समजतातच हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिया मांडून आरोपींच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीनं आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरु केली आहे. 
Edited by - Priya Dixit