मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (09:17 IST)

आनंदाची बातमी ! Global Teacher रणजीतसिंह डिसले गुरूजींना अब्दुल कलाम पुरस्कार

काही दिवसांपुर्वीच आपल्या राजीनाम्यामुळे चर्चेत आलेले ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
तंत्रज्ञानामधील अभिनव प्रयोगामुळे हा पुरस्कार डिसले गुरुजींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "खरंतर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्नं पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित."
 
 
२७ जुलैला रामेश्वरम येथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डिसले गुरूजींना त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येईल. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतो आहे, जबाबदारी वाढली आहे असं डिसले गुरूजींनी म्हटलं आहे.