1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (16:27 IST)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अली आहे. यंदा मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु असून मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं दर्शवली आहे. 

मान्सून येत्या 19 मे रोजी म्हणजे आज रविवार पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

खुळे यांच्या माहितीनुसार, दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर समुद्र सपाटीपासून 1 ते 1.5 किमीच्या उंचीवर नैऋत्य कडून वार येत आहे. या वाऱ्यामुळे मान्सून येण्याचे समजते. 
यंदा 1 जून रोजी देशाचे प्रवेश द्वार जवळ केरळला मान्सून धडकणार आहे.  
 
Edited by - Priya Dixit