बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (21:26 IST)

नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’मोहिमेला चांगला प्रतिसाद

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्यापार्श्वभूमीवर नाशिक शहरात ‘नो व्हॅक्सिन, नो एंट्री’ची जोरदार अंमलबजावणी सुरू असून नाशिककराकडून  चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक शासकीय कार्यालयात देखील दोन्ही डोसची तपासणी  करण्यात येत आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिक निर्धास्त होऊन घराबाहेर पडत होते. मात्र काही दिवसांपूर्वी ओमायक्रोन या नव्या विषाणूमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क झाल्याने सोमवारपासून महत्वाच्या ठिकाणी नो व्हॅक्सिन नो एन्ट्री ची अंमलबजावणी सुरु केली आहे. म्हणजेच व्हॅकसिन शिवाय कुठल्याच सार्वजनिक ठिकाणी  प्रवेश दिला जात नसून यासाठी दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होईल असा विश्वास या मोहिमेद्वारे व्यक्त केला जात आहे.
 
दरम्यान नाशिक जिल्ह्यात खबरदारी घेण्याच्या सुचना पालकमंत्री भुजबळ  यांनी मागील आठवड्यात दिल्या होत्या. त्यानुसार ज्यांचे लसीचे एक किंवा दोन डोस पूर्ण झाले आहेत. अशांनाच शासकीय कार्यालयात  प्रवेश देण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांना करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद  जिल्हाधिकारी कार्यालय  आदी ठिकाणी या मोहिमेचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मॉल, मोठी दुकाने, एसटी स्टँडवर विना व्हॅक्सिन नागरिकांची तपासणी होणार असल्याने चांगलीच तारांबळ उडणार आहे.
 
तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानी व्हॅक्सिन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पहिल्या डोससह दुसरा डोस घेणे बंधनकारक असून यामुळे तिसऱ्या लाटेला अटकाव करण्यात नाशिक प्रशासनाला यश येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.