बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (15:56 IST)

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडू तीन बडे नेतेही चर्चेत

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी
काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.