1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (15:46 IST)

आमदारांचे निलंबन रद्द करा, मग विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या -देवेंद्र फडणवीस

Amdaranche suspension canceled
हिवाळी अधिवेशानात पहिल्या दिवसापासून विरोध आक्रमक दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मात्र वेळी या 12 आमदारांचे निलंबन रद्द करा, मग विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.
विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्‍या बारा आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले होते. भाजपा आमदार आशिष शेलार आणि 11 आमदारांनी या निलं‍बनाविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे. ही याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने दाखल करुन घेतली असून 11 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्‍यावेळी न्‍यायालयाने सराकर आणि विधिमंडळाला आपली बाजू मांडण्‍यास सांगितले आहे. दरम्‍यान, ही याचिका दाखल करुन घेताना न्‍यायालयाने या आमदारांचा आपल्‍या निलंबनाचा कालावधी कमी करण्‍यासाठी विधानसभा अध्‍यक्षांना विनंती करण्‍याचा अधिकार अबादीत ठेवला आहे. त्‍यानुसार आमदार आशिष शेलार यांच्‍यासह 12 आमदारांनी प्रत्‍येकांनी स्‍वत्रपणे पत्र लिहून विधानसभा उपाध्‍यक्षांना विनंती केली आहे.