चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
नाशिकमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एका चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आझाद शेखच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पाहून पोलिसही हैराण झाले आहेत.
केवळ एकदाच नाही तर महिलेला धमकावून आरोपी आझाद शेख याने वारंवार बलात्कार केला आहे. पीडितेने कशीतरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या चिमुरडीच्या मानेवर चाकू ठेऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर अशाच प्रकारे धमकावत त्याने संबंधित महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेकवेळा बलात्कार केला.
आरोपी आझाद शेखने 17 डिसेंबर रोजी एका लॉजमध्ये संबंधित महिलेवर रात्रभर बलात्कार केला. यानंतर तो महिलेला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथेही त्याने महिलेवर अनेकदा बलात्कार केला. यानंतर तो महिलेला सोडून नाशिकमधून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी त्यांनी रेल्वे स्टेशन गाठले. बाहेर जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता.
मात्र त्याच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ नाशिकरोड रेल्वे स्थानक गाठले आणि आरोपीला पकडण्यात यश आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.