शिक्षकांच्या भरतीवर सरकारचा निर्णय,मुलाखतीद्वारे भरणार जागा-वर्षा गायकवाड
सध्या राज्यभरात विविध विभागातील रिक्त पद भरण्याकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे.आता शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या संदर्भात माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
ही प्रक्रिया खाजगी शिक्षण संस्थेच्या जागेसाठी आहे. या प्रक्रियेत एकूण 3902 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून आता पर्यंत 2062 जागांसाठी मुलाखत प्रक्रिया सुरु झाली आहे.वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सांगितले आहे की ,पवित्र पोर्टल या माध्यमाद्वारे 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 आवडीच्या क्रमावर 3902 उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिफारस केली जात आहे.
सध्या राज्यात सुमारे शिक्षकांच्या पदासाठी 40 हजार पदे रिक्त आहे.या भरतीच्या माध्यमातून सरकार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने सध्या 6100 रिक्त जागा भरण्यासाठी मंजुरी दिली आहे.ही रिक्त जागा टप्याटप्प्याने भरण्याची माहिती दिली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उमेदवारांना या मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.