शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (10:19 IST)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

तसेच महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.