सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (08:19 IST)

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

Ramesh Bais
राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्ती, अध्यक्ष दिलीप दास, सचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टर, उत्तम शिक्षक, उत्तम संगीतकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत दिले आहेत.  मुंबई आणि राज्याच्या विकासात  बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
 
बंगाल क्लबची स्थापन1922 साली करण्यात आली तर येथील दुर्गा पूजा 1935 पासून सुरु असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor