गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (15:21 IST)

नागपूर पोलिसांना मोठं यश, फेब्रुवारी महिन्यात झिरो मर्डरची नोंद

राज्याची क्राइम कॅपिटल अशी नको असलेली ओळख गुन्हेगारी घटनांमुळे नागपुरला मिळाली होती, खुनाच्या घटनांमुळे नागपूर काही महिन्यांपूर्वी चर्चेत रहायचे,मात्र आता शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आणण्याकरिता नागपूर  पोलिसांना मोठं यश मिळालं आहे शहरात फेब्रुवारीमध्ये एकही हत्येची घटना घडली नाही, त्यामुळे फेब्रुवारी महिना हा शांतीचा ठरला आहे. 
 
 गुन्हेगाराची राजधानी म्हणून ओळख असलेलं नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात झिरो मर्डरची नोंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे,नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता ठोस उपाय योजना केल्या आहेत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूर शहर हे कसे गुन्हे मुक्त होईल यासाठी ठोस उपाय योजना आखल्या. शहरात जवळपास हत्येचा दरवर्षी 80 ते 100 घटना घडता,त्यानुसार दर महिन्यात 8 ते 10 हत्या होत असतांना गेल्या डिसेंबर मध्ये 5 हत्या तर जानेवारी महिन्यात 4 हत्या फेब्रुवारी महिन्यात 0 हत्येची नोंद झाली आहे.