रविवार, 23 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:25 IST)

नंदुरबार येथे प्रसादातून 125 लोकांना विषबाधा

125 people poisoned by Prasad in Nandurbar
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथे महाशिवरात्रि निमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन गावात एका ठिकाणी करण्यात आलं होतं. मात्र महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होवू लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
 माहिती आरोग्य विभागाचे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 लोकांना विषबाधा झाली तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून 40 जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत.  
 
विषवाधा कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. कारण गावातल्या अनेकांना विषबाधा झाल्याने हा प्रकार कुणी जाणूनबुजून केलाय किंवा यात कशामुळे झालाय याची चौकशी करण्यात येणार आहे.