गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:28 IST)

नागपूरच्या कुही तालुक्यात वृद्धाची धगधगत्या चितेत उडी

In Kuhi taluka of Nagpur
नागपूरच्या कुही तालुक्यातील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. 
 
आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. 2006 मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, हे दुखणे अजूनही सुरूच होते. माहितीनुसार, मृतकाच्या मुलाची गॅस गोडावूनलगत शेती आहे. 
 
 मृतकाने मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यावर तणस पसरवले. विड्याच्या पानावर दिवे लावून सरणाची पूजा केली. त्यानंतर सरण पेटवून चितेत उडी घेतली, असा संशय आहे. त्यांचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाल्याचे दिसून आले.