1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2024 (22:21 IST)

नवरदेवाची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

death
लग्नाच्या दिवशी नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. सुरज राजेंद्र रायकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. सुरजचे आज मंगळवारी लग्न होते. घरात लग्नाचा आनंद सोहळा होता. त्याने सकाळी आपल्या मामाला फोन करून मला हे लग्न नाही करायचे असे सांगितले आणि घराबाहेर पडला. 
 
त्याची सर्वत्र शोधाशोध झाली मात्र सुरज सापडला नाही.पोलिसांना काही वेळानंतर त्याची दुचाकी घरापासून थोड्या अंतरावर वाण्याचा मळा येथे एका विहिरी जवळ सापडली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत शोधण्यास सुरु केले असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळला. लग्नाच्या दिवशी सुरज ने हे टोकाचे पाऊल उचल्याने घरात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनाचा तपास करत आहे.  
 
Edited By- Priya Dixit