बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (17:07 IST)

जीएसटी विधेयक : महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर

वस्तू आणि सेवा कर अर्धात जीएसटी विधेयक  महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी जीएसटी विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिल्याचे जाहीर केले. त्याबरोबरच जीएसटी संदर्भातील तीन विधेयकेही एकमताने मंजूर करण्यात आली. दरम्यान जीएसटीला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.