शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:03 IST)

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिका रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी नाशिक मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
 
गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले. त्यानंतर  त्यांनी नाशिक शहरातील मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनीदेखील लस घेतली. तसेच या ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सर्व नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.