गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 (12:06 IST)

गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आवाहन

Ganeshotsav
सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी झाली असून आता भाविक बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहे.  श्री गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव आहे. जो विविधतेत एकता दर्शवतो.गणेशोत्सवादरम्यान, गणपती अनेकदा डीजेच्या आवाजात येतात. पण बऱ्याचदा असे घडते की भक्तीगीतां ऐवजी डीजेवर अनेक बॉलिवूड गाणी वाजवली जातात. यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जातात, परंतु हा गणपतीचा अपमान देखील मानला जातो. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो.
या साठी गणेशोत्सवापूर्वी संजय शिरसाट यांनी उत्सव डीजेमुक्त साजरा करण्याचे आवाहन केले आहे.राज्याचे सामाजिक न्याय आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मोठा आवाज अनेक लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
 
यावर्षी श्री गणेशोत्सव सुरळीतपणे साजरा करण्यासाठी तो आनंदाने साजरा केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी नुकतेच कॅन्टोन्मेंट येथील श्री गणेश महासंघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे. 
या प्रसंगी कार्यकारी अध्यक्ष रुखमाजी जाधव, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर डॉ. प्रमोद राठोड, राजेंद्र जंजाळ, मिलिंद दाभाडे, हर्षदा शिरसाट, प्रतिभा जगताप, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशांत तरगे, करणसिंग काकस, माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर, युवराज डोंगरे, विनोद साबळे उपस्थित होते. कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष श्री गणेश महासंघ विशाल दाभाडे, कार्याध्यक्ष विशाल काकडे, प्रचार प्रमुख सचिन अंभोरे आणि विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि अधिकारी उपस्थित होते.
Edited By - Priya  Dixit