छत्रपती संभाजी नगरात गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्याकरून वादात तरुणावर जीवघेणा हल्ला, मृत्यू
गणेशोत्सवाला काहीच दिवस बाकी आहे. गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेशोत्सवाचे ढोल जमीन मालकाच्या जमिनीवर ठेवण्यावरून झालेल्या वादात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. मयताचे नाव प्रमोद पाडसवान असे आहे. हल्ल्यात त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोचा प्लॉट त्यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतला. गणेश मंडळाचे उत्सव त्यांच्या प्लॉटवर साजरे केले जायचे. या गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी पाडसवान यांना बांधकाम करण्यासाठी अडवायचे. गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी पाडसवान यांच्या जमिनीवर पत्र्याचे शेड टाकले. पाडसवान यांनी सिडकोकडे अतिक्रमण केल्याची रीतसर तक्रार केली आणि एप्रिल महिन्यात अतिक्रमण हटवण्यात आले.
ALSO READ: आरएसएसचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी संघ नागपूरमध्ये विजयादशमी उत्सव साजरा करणार
गेल्या 15 -20 दिवसांपूर्वी मंडळाने पुन्हा त्यांच्या जमिनीवर ढोल आणून ठेवले यावरून पाडसवान कुटुंब आणि मंडळाच्या अध्यक्षांमध्ये वाद झाला. पाडसवान कुटुंबीयांनी जमिनीवर बांधकाम काढले असून त्याचे साहित्य देखील प्लॉटवर ठेवले होते. बांधकाम साहित्य बाजू करून गणोशोत्सवाचे कार्यक्रम करण्याचे गणेश मंडळ अध्यक्ष निमोने दाब टाकायचे.
यावरून पाडसवान कुटुंब आणि निमोने यांच्या जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात निमोने कुटुंबाचे राजकीय संबंध आणि वादावरून पाडसवान कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला तर त्यांचे वडील आणि मुलगा जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit