पुण्यात भर रस्त्यात बिल्डरवर गोळीबार
पुणे - पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरवमध्ये शनिवारी सकाळी बिल्डरवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात बिल्डर योगेश शेलार थोडक्यात बचावले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायनासोर गार्डनसमोर सकाळी अकराच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. हा हल्ला कोणी आणि कोणत्या हेतूने केला असावा? हे अद्यापही समजू शकलेलं नाही.
भर रस्त्यात हल्लेखोरांनी बिल्डर शेलार यांच्यावर गोळ्या झाडून स्विफ्ट कार मधून पसार झाले. शेलार यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.