पानसरेंच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवा
मुंबई : ज्येष्ठ नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची हत्या करणाऱ्य़ांची चौकशी आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवावी अशी त्यांच्या कुटुंबाने विनंती केली आहे. पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हा विनंती अर्ज कोर्टात दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या खंडपीठा पुढे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट आहे. त्याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे गोविंद पानसरे यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे.