1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जुलै 2025 (10:37 IST)

मतदार यादीतील अनियमितता रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी, ही समिती उपाययोजना सुचवेल

congress
काँग्रेस सतत भाजपवर मतदार यादीत छेडछाड करून निवडणुका जिंकल्याचा आरोप करत आहे. भविष्यात, विशेषतः नागरी निवडणुकांमध्ये अनियमितता रोखण्यासाठी काँग्रेस आधीच तयारी करत आहे. निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून होणाऱ्या संभाव्य अनियमितता रोखण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती स्थापन केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती निवडणुकीत संभाव्य अनियमितता ओळखेल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवेल. भाजपने विविध प्रकारे मतदार यादीत छेडछाड करून विधानसभा निवडणुका जिंकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.  
७ सदस्यीय समिती तयार
आता काँग्रेसने या ७ सदस्यीय समितीमध्ये समन्वयक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुड्डे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभा उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित वीरेंद्र जगताप आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड यांचा समावेश केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik