मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

यांची होणार राजकारणात प्रवेश, बॉलीवूड अभिनेत्री नाहीत त्या आहेत यांच्या कन्या

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील राजकारणात प्रवेश करत आहेत. अंकिता आयांनी जिल्हा परिषद गटासाठीच्या पोटनिवडणुकित काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली आहे. 
 
निवडणुकीच्या निमित्ताने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारण दिसणार आहे. अंकिता पाटील या सध्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या असून, त्या हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी पार पाडत आहेत. 
 
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री या आगोदर जिल्हा परिषद सदस्य होत्या. पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी अंकिता पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अंकिता यांच्या रुपाने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दिसणार आहे. हर्धवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं काम केले आहे. 
 
हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला. मात्र त्यांच्या कन्या आता राजकारणात येणार असून त्यांची जोरदार चर्चा आहे.