मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (16:06 IST)

अनुराग कश्यपच्या मुलीला दुष्कर्माची धमकी, मोदींना विचारले, आपल्या फॉलोअर्सला कसे हाताळायचे

लोकसभा निवडणूक निकाल 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची जीत झाल्याने पूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजने देखील मोदींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. यात फिल्ममेकर अनुराग कश्यपचे नाव देखील सामील आहे. शुभेच्छा देत अनुराग कश्यपने मोदींना आपली समस्यादेखील सांगितली.
 
अनुराग कश्यपच्या मुलीला रेपची धमकी मिळाली आहे. अनुराग कश्यपने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की 'प्रिय नरेंद्र मोदी सर. आपल्याला शुभेच्छा. सर कृपा करून मला सांगा की आपल्या अशा फॉलोअर्सला कसे हाताळायचे जे आपला विरोधी असल्यामुळे माझ्या मुलीला या प्रकारे मेसेज करतात.'
 
अनुरागच्या या पोस्टनंतर सोशल मीडयावर अनेक लोकांनी त्यांचे समर्थन केले आहे. अनेक मोदी समर्थकांनी कमेंट करून लिहिले की ते पीएमला सपोर्ट करतात पण अशा प्रकाराच्या गोष्टींना मुळीच नाही. 
 
उल्लेखनीय आहे की अनुराग कश्यप नेहमी भाजप सरकार आणि पीएम मोदी यांच्याविरुद्ध बोलतात. यासाठी अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले गेले आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलियाने अलीकडेच शाळेतील शिक्षण पूर्ण केले आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि अनेकदा फोटो शेअर करत असते.