शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (07:49 IST)

हा कृषी मंत्री होता, इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय : भाई जगताप

मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस, अशा शब्दांमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी माजी कृषी मंत्री अनिल बोडेंना  जोरदार फटकारलं आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर काँग्रेस नेते भाई जगताप आणि भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. 
 
मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस कोण आहे हा?…. दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे, यांना सत्तेचा माज आलाय… यांचा माज बाहेर येतोय.. देशाचा अन्नदाता बसलाय दिल्लीत.. ते काही काँग्रेसवाले आहेत का…? इतकं अंधाधूंद माजलेले आहेत तुमचा माज शेतकरी आणि कामगार उतरवेल. यांनी हे केले त्यांनी ते केलं असं सांगता, तुम्ही काय केलं हे सांगा अशा शब्दांमध्ये भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला.
 
नरेंद्र मोदींना मतदानाच्या माध्यमातून हरवता येत नाही. आज जेव्हा भारत सर्व आघाड्यांवर अग्रस्थानावर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अराजक निर्माण करुन मोदींना नामोहरम करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. भाई जगताप, राहुल गांधी यांचे संपूर्ण भारतात अराजक माजवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं काम काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षानं केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला.