रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (13:45 IST)

हेडफोननं घेतला तरुणाचा जीव

हेडफोन कानात लावून अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशीच घटना सांगलीत घडली हे. हेडफोन कानात लावून गाणी ऐकत असताना अपघात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागंली जिल्ह्यातील मिरजेत पोलिसभरती व आर्मी भरतीच्या सराव करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर वडाच्या झाडाची फांदी पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. हर्षवर्धन  कदम असे या तरूणाचे नाव आहे.
 
मिरजेत सायंकाळी वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली होती. मिरज शासकीय रुग्णालयाच्या ग्राउंड वर पोलिसभरती व आर्मी भरतीच्या सराव करण्यासाठी गेला सरावानंतर तो कंपाउंडच्या भिंतीवर चढून बसला त्याच्या कानात हेडफोन लागले होते आणि तो गाणं ऐकत होता. त्याला झाडाची फांदी मोडण्याचा आवाज ऐकू आला नाही आणि त्याच्या अंगावर वडाच्या झाडाची फांदी पडून तरुण जागीच ठार झाला .
 
नेहमी प्रमाणे मिरज शासकीय महाविद्यालय ग्राउंडवर भरतीचा सरावासाठी हर्षवर्धन गेला होता. वादळी वारा सुटून पावसाला सुरुवात झाल्याने वडाच्या झाडाखाली कंपाउंड भिंतीवर बसला होता यावेळी मोठी झाडाची फांदी हर्षवर्धन कदम यांच्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाला. हर्षवर्धनचा मृतदेह फांदी खाली अडल्याने त्याला बाहेर काढणे अश्यक्य झाले होते. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. कटरच्या साहाय्याने फांदी कट करून मृतदेह बाहेर तरुण आला.
 
तरुण मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. त्याच्या आईने मुलगा पोलिसात भरती होण्याचे स्वप्ना पहिले असता त्यांना त्याचा मृतदेह पाहावा लागला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.