1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (09:12 IST)

आरोग्य सहाय्यक ‘रोबोट रक्षक’ रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

health assistant
कोरोनाविरोधात लढण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील ईएमयू कारशेडमध्ये बनवण्यात आलेल्या आरोग्य सहाय्यक ‘रोबोट रक्षक’ रेल्वेच्या भायखळ्यातील डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये  बुधवारी सहायक म्हणून दाखल झाला.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांनी आज मेमोरियल रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय संचालिका डॉ. मीरा अरोरा यांच्याकडे हा रोबोट ‘रक्षक’ सुपूर्द केला. हा वैद्यकीय सहाय्य दूरस्थपणे डॉक्टर आणि रूग्णांमधील संवाद साध्य करण्यासाठी कार्यक्षमपणे तयार केला गेला आहे.