मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 14 जून 2020 (09:42 IST)

रेल्वे स्थानकाची जबाबदारी आता 'अर्जुन' कडे

रेल्वे सुरक्षा दलाने, रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणी आणि स्क्रीनिंगसाठी रोबोटिक कॅप्टन “अर्जुन” पुणे रेल्वे स्थानकांवर तैनात केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी तसेच रेल्वे स्थानक परिसरातील असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी अर्जुन रोबोटची मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
 
कॅप्टन अर्जुन मध्ये मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज आहे. संशयास्पद असामाजिक हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम वापरतात, इनबिल्ट सायरन, मोशन अ‍ॅक्टिवेटेड स्पॉटलाइट एच -२६४ प्रोसेसर यात आहेत. नेटवर्क बिघाड झाल्यास रेकॉर्डिंगसाठी अंतर्गत अंगभूत स्टोरेज देखील आहे. कॅप्टन अर्जुन थर्मल स्क्रीनिंग करतो आणि ०.५ सेकंदात प्रतिक्रियेसह डिजिटल डिस्प्ले पॅनेलमध्ये तापमान नोंदवितो आणि तापमान संदर्भ श्रेणीपेक्षा जास्त असल्यास स्वयंचलित अलार्म होतो.
 
कोविड-१९ वर जागरूकता संदेश देण्यासाठी यामध्ये स्पीकर्स लावण्यात आले आहे. कॅप्टन अर्जुन कडे सेन्सर-आधारित सॅनिटायझर आणि मास्क डिस्पेंसर देखील आहे आणि त्यांना हलवताही येऊ शकते. रोबोटमध्ये फ्लोर सॅनिटायझेशनसाठी चांगली सुविधा आहे.