शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (17:59 IST)

आईने कार्टून पाहू दिले नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

आईने कार्टून पाहू दिले नाही म्हणून पुण्यात एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राकेश शिंदे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. बिबवेवाडी येथील राजीव गांधी नगर परिसरात राकेश हा त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास राकेश टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी आईने कार्टून पाहू नकोस, म्हणून टीव्ही बंद केला आणि त्याला रागावली.
 
आई रागावल्याने राकेश घरातील वरच्या खोलीत जाऊन बसला. बराच वेळा झाला, राकेश खाली न आल्याने आईने वर जाऊन पाहिले असता राकेशने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.