शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 30 मे 2020 (12:55 IST)

BoycottMadeInChina : मिलिंद सोमणने Tik Tok अकाउंट केलं डिलीट, वांगचुक यांच्या मोहिमेत सामील

अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे टिक टॉकवर देखील प्रचंड फोलॉर्वस आहेत. तरी‍ मिलिंदने हे अकाउंट डिलीट केले आहे. त्याने ट्विटरवर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा Boycott chinese Products हा विडिओ शअेर केला आहे.
 
सोनम वांगचुक यांनी BoycottchineseProducts मोहीम सुरु केली आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वात आधी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहीजे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
भारत आणि चीनच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशात जर आपल्याला आर्थिक कणा मोडयाचा असेल तर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे फार गरजेचे आहे असे सोनम वांगचुक यांचे मत आहे.
 
यांच्या अपीलचा प्रभाव सोशल मीडियावर दिसून येत आहे. लोकांनी बॉयकॉट मेड इन चायना मोहीम सुरु केली आहे. BoycottMadeInchina आणि BoycottchineseProducts हॅशटॅगसह लोकांनी चीनी सॉफ्टवेयर आणि हार्डवेयरचे बहिष्कार करण्याचे मन बनवले आहे. भाजप नेते मेजर सुरेंद्र पुनिया देखील या मोहीमेत सामील झाले आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवर BoycottMadeInchina हॅशटॅगसह ते लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की कशा प्रकारे भारतीय तरुण चीनची मदत करत आहे. 
 
सोनम वांगचुक BoycottMadeInchina आणि SoftwareInAWeekHardwareInAYear हॅशटॅग सह जगभरात मोहीम सुरु केली आहे. त्यांनी एका आठवड्यात चीनी सॉफ्टवेयर आणि अॅप सोडण्याची अपील केली आहे. यासाठी आपल्या वीडिओ संदेशात सोनम वांगचुक म्हणतात की मी आपल्या चायना मेड फोनहून मुक्त होणार आहे आणि एक वर्षात त्या सर्व गोष्ट ज्या चीनमध्ये निर्मित होत आहे. त्यांनी देशातील लोकांना बायकॉट मेड इन चाइना संदेश 100 लोकांपर्यंत पोहचवण्याची अपील केली आहे.