1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सोनू सूदचा गुगल सर्च वाढला

sonu sood
अभिनेता  सोनू सूदने मजुरांसाठी त्याने बसेसची, जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पडद्यावर खलनायक साकारणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे. मदतीच्या या कामामुळे सोनू सूदच्या गुगल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गुगल ट्रेण्ड्समध्ये त्याने अक्षय कुमारलाही मागे टाकलं आहे.
 
गुगलवर अक्षय कुमारच्या तुलनेत सोनू सूदचा सर्च वाढला आहे. अंदमान आणि निकोबार, मिझोरम, दमण आणि दीव, अरुणाचल प्रदेश, चंदीगड या ठिकाणी गुगलवर सोनू सूदबद्दल सर्वाधिक सर्च केला गेला आहे. सोनू सूदने काय काम केलं, त्याचा वॉलपेपर, त्याचं मूळ गाव, त्याचा टोल फ्री नंबर असे विविध सर्च नेटकऱ्यांकडून केले जात आहेत.