कोरोना लस संशोधनाच्या दुसऱ्या टप्प्यात
युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी शुक्रवारी कोरोना विषाणूवर बनवण्यात येणाऱ्या लसीचा पहिला टप्पा यशस्वी झाला असल्याचे म्हटले आहे. आता हे संशोधन मानवावर चाचणी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. या चाचणीसाठी १० हजाराहून अधिक लोकांचा समावेश ते करत आहेत.
लस बनवण्याचे परिक्षणाचा पहिला टप्पा गेल्या महिन्यात सुरू करण्यात आला होता. ज्यामध्ये ५५ वर्षाखालील जवळपास एक हजार निरोगी लोकांवर त्यांची चाचणी करण्यात आली. आता त्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक ओळखण्यासाठी ७० वर्षाहून जास्त आणि ५ ते १२ वयोगटातील मुलांसह १० हजार २०० हून अधिक लोकांवर त्याचे प्रयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ChAdOx1 आणि कोविड – १९ या लसीने माकडांवर केलेल्या चाचणी प्रयोगात सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टिट्युटमध्ये व्हॅक्सिनोलॉजीचे प्राध्यापक सारा गिलबर्ट यांनी याबाबत माहिती दिली की, कोविड – १९ लसीची ट्रायल टीम ChAdOx1 nCoV-19 ची सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटी तसेच लस प्रभावी बनवण्यासाठी कठिण परिश्रम घेत आहेत. देशातील काही इतर भागांमध्येही या संशोधनाचे प्रयोग केले जातील.