संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्त अनेक आजारांवर फायदेशीर तुळशीचा काढा
युनानी औषधींच्या पद्धतीनुसार तुळशीमध्ये रोगांना बरे करण्याची क्षमता आहे. तुळस संसर्गाला दूर करण्याव्यतिरिक्त ताण आणि इतर रोगांविरुद्ध नैसर्गिकरीत्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करते.
सर्दी पडसं च्या प्रभावाला कमी करते. त्याच बरोबर तापाचे संसर्ग कमी करण्याव्यतिरिक्त मलेरिया, कांजण्या (चिकन पॉक्स), गोवर, इन्फ्लुएंझा, आणि दमा या सारख्या आजारांवर ही उपचारात्मक आहे.
तुळशी हृदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत, फुफ्फुस, उच्च रक्तदाब, आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. संसर्गाच्या वेळी या तुळशीचा काढा बनवून प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
साहित्य : 500 ग्राम तुळशीची वाळवलेली पाने (सावलीत वाळवलेली), 50 ग्राम दालचिनी, 100 ग्राम तेजपान, 250 ग्राम बडी शेप, 150 ग्राम लहान वेलचीचे दाणे, 25 ग्राम काळे मीरे.
तुळशीचा काढा बनविण्याची सोपी पद्धत : सर्व साहित्य एक एक करून खलबत्त्यात ठेचून घ्या. आता हे सर्व साहित्ये मिसळून एका बरणीमध्ये भरून ठेवा. तुळशीच्या काढ्यासाठी लागणारे साहित्य तयार आहे. 2 कप चहासाठी हे साहित्य अर्धा चमचा पुरेसे आहे.
2 कप पाणी एका पातेल्यात गरम करण्यासाठी गॅस वर ठेवावे. पाणी उकळल्यावर पातेलं गॅसवरून खाली काढून त्यात अर्धा लहान चमचा हे मिश्रण घालून झाकून द्यावं. पुन्हा उकळी घेऊन नंतर गाळून घ्यावं. गरम काढा फुंकर मारत प्यावा.