सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (11:28 IST)

Health Department Recruitment 2023 :आरोग्य विभागात 11 हजार रिक्त पद भरले जाणार आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची घोषणा

tanaji sawant
Health Department Recruitment 2023 :राज्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे . लवकरच राज्यात आरोग्य विभागामध्ये तब्बल 11 हजार रिक्तपदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून 11 हजार रिक्त पद भरले जाणार आहे. तत्कालीन सरकारच्या काळात 2021 साली आरोग्य विभागासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या वेळी पेपरफुटी प्रकार झाले असून आरोग्य विभागासाठीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेत पुन्हा आरोग्य विभागासाठीची मेगा भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 
 
या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची पदे मिळून एकूण10 हजार 949 पदांची भरती केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS मार्फत राबण्याची माहिती तानाजी सावंत यांच्या कडून मिळाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit