आरोग्य विभाग भरती परीक्षेचा पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांना आली वेगवेगळ्या जिल्ह्यांतली केंद्र

Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (21:18 IST)
24 आणि 31 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या क आणि ड गटाच्या पदांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झालाय.

सोशल मीडियावरून अनेक परीक्षार्थींनी आपली अडचण मांडली आहे. #आरोग्यभरती_की_भोंगळभरती असा हॅशटॅग ट्विटरवर वापरला जातोय.

काही विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतलं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे. तर काहींना त्यांनी प्राधान्य दिलेल्या ठिकाणापासून दूर असणारं केंद्र मिळालंय.

यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात हीच परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता.
फॉर्म भरताना आपण नागपूर केंद्र निवडलं होतं, पण असं असून सकाळच्या सत्रासाठी ठाणे आणि दुपारच्या सत्रासाठी वाशिम परीक्षा केंद्र हॉलतिकीटवर असल्याचं ट्वीट नितेश दादमल यांनी केलंय.
24 आणि 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट क आणि डची परीक्षा होणार आहे. पण यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज भरल्याने त्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आलेली आहे.
यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी आपलं परीक्षाकेंद्र आणि पिनकोड जुळत नसल्याचंही म्हटलंय.
दोन वेगवेगळ्या संवर्गासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा एक पेपर बुडण्याची भीती आहे.

अनेकांनी वैतागून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना टोमणे मारणारी ट्वीट्स केली आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज परीक्षार्थींना 24 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिळाले होते. आता पुन्हा एकदा या परीक्षेबद्दल गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

परीक्षेतल्या या गोंधळाबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करणारं ट्वीट केलंय.

"मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. मुख्यमंत्री साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा," असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
सरकार वा आरोग्य विभागाकडून अद्याप या भरती परीक्षांबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. क संवर्गातली 2739 आणि ड संवर्गातील 3466 पदांसाठी या परीक्षा होणार आहेत.
राज्यातल्या 1500 केंद्रांवर या परीक्षा एकाचवेळी होणार असून रविवार असल्याने या दोन्ही दिवशी शाळा उपलब्ध असल्याने 24 आणि 31 ऑक्टोबरची निवड करण्यात आल्याचं नवीन तारखा जाहीर करताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं होतं.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले
भारतीयांना खूप वाईट सवय आहे. कुठेही थुंकणे आणि कुठेही शौचालय करणे. उघड्यावर थुंकणे, शौचास ...

खासदार संभाजीराजे यांच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण; आता ...

खासदार संभाजीराजे यांच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण; आता पुढे काय होणार?
राज्यसभेची खासदारकीची निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती ...

उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष ...

उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा--- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सेवा ही संघटन या मंत्राच्या आधारावर काम करून ...

नगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन

नगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन
सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री ...

Asia Cup 2022: भारताने इंडोनेशियावर 16-0 ने मात करून सुपर 4 ...

Asia Cup 2022: भारताने इंडोनेशियावर 16-0 ने मात करून सुपर 4 साठी क्वालीफाई, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
गतविजेत्या भारताने यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या बाद फेरीत ...