बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (11:30 IST)

पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट

monsoon
महाराष्ट्रात पावसाचा प्रवास सुरु आहे. हवामान विभागाने येत्या चार दिवांसमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.
 
तर रायगड करिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. 
 
तसेच हवामान विभागाने दिलेल्या या माहितीनुसार 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik