शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (09:17 IST)

मेघगर्जनेसह वादळ-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस

rain in india
मेघगर्जनेसह धुवाधार वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुसद मध्ये ढगाळी वातावरण असून ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे फळबाग पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हवामान खात्याने तालुक्यासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज  आलेल्या  अवकाळी पावसामुळे खरा ठरला आहे.
 
पुसद तालुक्याचे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. प्रखर ऊन तापत असल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसल्याचे दिसत होते. दुपारनंतर बाजारपेठ व रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. दोन दिवसाच्या या ढगाळी वातावरणामुळे मात्र तापमानामध्ये कमी आली. हवेत गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना व्यवसायिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना प्रखर कोणाच्या गर्मीपासून काही अंशी दिलासा मिळाला होता. त्यात  आलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र या अवकाळी पावसामुळे रोगराई व शेत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

Edited by -Ratnadeep Ranshoor