1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:16 IST)

'या' काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

heavy vehicles
गणेशोत्सवासाठी रस्तेमार्गाने कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
 
यामध्ये १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू , रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. याशिवाय, २८ ऑगस्ट सकाळपासून ते २९ ऑगस्ट या कालावधीतही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुन्हा बंदी घातली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.